Home > News Update > ठाकरेंनी भ्रष्टाचाराच्या पैशातून नवीन मातोश्री बांधली – नितेश राणे

ठाकरेंनी भ्रष्टाचाराच्या पैशातून नवीन मातोश्री बांधली – नितेश राणे

मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या आडून भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. भ्रष्टाचारातून गोळा केलेल्या पैशांतूनच उद्धव ठाकरे यांनी नवीन मातोश्री बंगला बांधल्याचा गंभीर आऱोप राणे यांनी पत्रकार परिषदेत केलाय.

ठाकरेंनी भ्रष्टाचाराच्या पैशातून नवीन मातोश्री बांधली – नितेश राणे
X

भाजपा आमदार नितेश राणे आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यातील वाद- विवाद वाढतच आहेत.त्यातच आज झालेल्या नितेश राणेंच्या पत्रकार परिषदेत राणेंनी 'तुझा मालकाने भ्रष्टाचार करून नवीन मातोश्री बांधली' आहे. असा टोला संजय राऊत यांना लगावला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे विरूद्ध राणे असं शाब्दिक युद्ध सुरूच असतं. यात आता राणेंकडून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना ओढण्यात आलंय. संजय राऊतंचा उल्लेख करत नितेश राणे म्हणाले, “ तुझ्या मालकाने भ्रष्टाचार करून नवीन मातोश्री बांधलीय” असा घणाघाती आरोपच राणे यांनी केलाय.

नवी दिल्लीतल्या नव्या संसद भवनाच्या उभारणीवरही खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतलाय. नवीन संसद भवन बांधण्याची गरज काय, जुने संसद भवन अजून देखील चांगल्या स्थितीत असल्याचं सांगितलं होतं. राऊतांच्या या वक्तव्यावर आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

राणे म्हणाले, “राऊत हे नेहमी पंतप्रधान मोदी आणि राज्यपाल यांच्यावर टीका करतात. अजित पवार राष्ट्रवादी मधून कसे बाहेर पडतील यासाठी राऊत दिवस रात्र प्रयत्न करत आहेत. म्हणूनच सामनाच्या अग्रलेखामध्ये अजित पवार बॅग भरून भाजपा सोबत जाणार आहेत असं राऊतांनी लिहिलं होत, याची आठवणही राणे यांनी यावेळी करून दिली.

Updated : 24 May 2023 11:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top