Home > News Update > मुंबईतील ब्रीच कँडीमध्ये एका उंच इमारतीला भीषण आग

मुंबईतील ब्रीच कँडीमध्ये एका उंच इमारतीला भीषण आग

मुंबईतील ब्रीच कँडीमध्ये एका उंच इमारतीला भीषण आग
X

मुंबईत पेडर रोडवरील ब्रीच कँडी रुग्णालयाती(Breach Candy) एका इमारतीला भीषण आग लागली होती. ही आग १२ व्या मजल्यावर लागली होती. त्यामुळे अग्निशमन दलापुढे हे मोठे आवाहान होत परंतु अग्निशमन दलाने ही आग आता आटोक्यात आणली आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबईतील ब्रीच कँडी येथील पेडर रोडवरील एका उंच इमारतीला शनिवारी रात्री आग लागली. मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, ब्रीच कँडी CHS (G+15), भुलाबाई देसाई रोड, ब्रीच कँडी हॉस्पिटलजवळ, पेडर रोड येथे रात्री 10 वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या 12व्या आणि 14व्या मजल्यावर लेव्हल 1 ची आग लागली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि चौदा मजली इमारत रिकामी करण्यात मदत केल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. अद्याप कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार 12व्या मजल्यावरून दोन जणांना जिन्यातून बाहेर काढण्यात आले तर काही जण इमारतीत अडकले आहेत.

Updated : 28 May 2023 1:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top