Home > News Update > राज्यात मास्कची सक्ती लागू झाली आहे का? आरोग्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

राज्यात मास्कची सक्ती लागू झाली आहे का? आरोग्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

राज्यात मास्कची सक्ती लागू झाली आहे का? आरोग्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
X

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, सार्वजनिक ठिकाणी मास्क आणि कोरोनाचे नियम पाळावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनीही केले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा मास्कची सक्ती लागू करण्यात आली आहे, अशा स्वरुपाचे एक पत्र व्हायरल झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात मास्कची सक्ती कऱण्यात आल्याची चर्चा आहे पण राज्य सरकारने अशी कोणतीही सक्ती केली नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई, , पुणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या काहीशी वाढली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने घेतलेल्या बैठकीत सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन करावे असे ठरले होते, पण सक्तीचा निर्णय झालेला नाही, अशी माहिती टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. गेल्या दोन आठवड्यात राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने गर्दीच्या तसेच बंदिस्त ठिकाणी मास्क वापरावा असे आवाहन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर कोरोनाचे लसीकरण, बूस्टर डोस याबाबतही त्यांनी आवाहन केले आहे. त्याचबरोबर जिल्ह्या जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढील काही दिवसात कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेऊन मास्क सक्तीबाबत निर्णय़ घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.

Updated : 4 Jun 2022 8:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top