Home > News Update > मुंबईसह राज्यभरात पावसाची हजेरी..

मुंबईसह राज्यभरात पावसाची हजेरी..

पहाटे साडेसहाच्या सुमारास मुंबईत पाऊस आणि विजांचा कडकडाट पाहायला मिळाला. रात्रीपासून मुंबई, ठाण्यासह राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर सकाळपासून मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस सुरू झाला. मार्च महिन्यामुळे जे नागरिक उकाड्यामुळे हैराण होते त्यांना दिलासा जरी मिळाला असला तरी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं आहे.

मुंबईसह राज्यभरात पावसाची हजेरी..
X

पहाटे साडेसहाच्या सुमारास मुंबईत पाऊस आणि विजांचा कडकडाट पाहायला मिळाला. रात्रीपासून मुंबई, ठाण्यासह राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर सकाळपासून मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस सुरू झाला. मार्च महिन्यामुळे जे नागरिक उकाड्यामुळे हैराण होते त्यांना दिलासा जरी मिळाला असला तरी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं आहे.

अरबी समुद्रातून पश्चिमेकडील वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे गारवा जाणवत आहे. अचानक आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी व्यायाम आणि व्यवसाय, नोकरी करण्यासाठी सकाळीच घराबाहेर पडलेल्या अनेकांची घाई झाली.

उपनगरात पाऊस जास्त पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून निसर्गात ढगाळ वातावरण आहे. पहाटे पाचच्या सुमारास विरार पूर्वेकडील चंदनसार कोपरी चिखल, डोंगरी खानीवाडे येथे मुसळधार पाऊस झाला आहेत, तर नालासोपारा येथे अधूनमधून मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे शहरातील मैदाने तलाव बनली आहेत. अनेक भागात रस्त्यावरही पाणी साचले आहे. सकाळी नोकरी, शाळा, व्यवसायासाठी निघालेल्या लोकांची गर्दी पाहायला मिळते. बस स्टॉप शेडचा वापर अनेकांनी आश्रय म्हणून केला.

Updated : 21 March 2023 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top