Home > News Update > अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकलाच !

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकलाच !

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ठिकाण अखेर ठरले आहे. तर संमेलनाध्य़क्षांच्या नावाबाबतही साहित्य परिषदेने महत्वाची माहिती दिली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकलाच !
X

94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार असल्याची घोषणा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांनी औरंगाबादेत केली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस हे साहित्य संमेलन होणार आहे. कोरोना काळातील हे साहित्य संमेलन असल्याने ते कसे होणार, संमेलनाध्यक्ष कोण असतील याबाबतची घोषणा 23 आणि 24 जानेवारीला नाशिकमधली बैठकीनंतर केले जाणार असल्याचे साहित्य परिषदेतर्फे सांगण्यात आले. संमेलन घेण्यासाठी काही ठिकाणांवरुन निमंत्रण आली होती. यामध्ये मराठवाड्यातील सेलू, अमळनेर, दिल्ली, नाशिक या ठिकाणांचा समावेश होता.

इतरांनी काही कारणास्तव नकार दिला त्यामुळं नाशिकवर शिक्कामोर्तब केल्याचे साहित्य परिषदेतर्फे सांगण्यात आले आहे. या संमेलनाला नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा पाठिंबा आहे, असेही साहित्य परिषदेने सांगितले आहे.. साहित्य संमेलनामध्ये राजकारण्यांची व्यासपीठावर गर्दी नको ही आमची भूमिका कायम आहे , मात्र ज्या नेत्यांना भूमिका आहे त्यांनी नक्कीच यावे असेही साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील म्हणाले. या आधीही विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर आर पाटील या सारख्या दिग्गज नेत्यांनी संमेलनामध्ये सामन्यांच्या रांगेत बसून सहभाग घेतलाय याची आठवण ठाले पाटील यांनी करून दिली. फक्त सुशील कुमार शिंदे यांनीच याबाबत तक्रार केल्याचं ते म्हणाले, राजकारण्यांना संमेलनाला बोलावले तर सगळं लक्ष त्यांच्यावर केंद्रित होते त्यामुळं साहित्यिकांचा सन्मान व्हावा ही आमची अपेक्षा आहे,क असे ठाले पाटील म्हणाले.

दिल्लीचे निमंत्रण कुणी नाकारले?

दरम्यान दिल्लीबाबत संजय नहार यांनी दिल्लीला साहित्य संमेलन घेण्याची मागणी केली होती. पण त्यांनीच दिल्लीकरांची ही संधी हुकवली, असा आरोपही ठाले पाटील यांनी केला आहे. "आम्ही दिल्लीला विशेष साहित्य संमेलन घेण्याची तयारी दर्शवली होती मात्र नहार यांनी तो प्रस्ताव नाकारला आणि यामुळं दिल्लीकरांची संधी हुकली" असे ठाले पाटील म्हणाले आहेत. शरद पवार यांच्या सहस्त्रदर्शनासाठी नाशिकला संमेलन घेतलं जात असल्याची चर्चा साफ चुकीची असल्याचे ठाले पाटील यांनी म्हटले आहे.

Updated : 8 Jan 2021 9:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top