Marathi Influencer Prathamesh Kadam Passes Away : मायलेकराची जोडी तुटली, प्रथमेश कदमची अचानक एक्झिट !
मराठमोळा रिलस्टार प्रथमेश कदम याचे निधन.. या बातमीनं मराठी रील आणि सोशल मीडिया विश्वात शोककळा पसरली असून, लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
X
Marathi Influencer Prathamesh Kadam Passes Away प्रसिद्ध मराठी कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम (Prathamesh Kadam) याचे वयाच्या २६व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने मराठी रील आणि सोशल मीडिया विश्वात शोककळा पसरली असून, लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
प्रथमेशचा जवळचा मित्र आणि सहकारी इन्फ्लुएन्सर तन्मय पाटेकर (Tanmay Patekar) यांनी सोशल मीडियावर ही धक्कादायक बातमी शेअर केली. प्रथमेश गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. प्रथमेशची अचानक एक्झिट नेमकी कशामुळे झाली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
प्रथमेश कदम कोण होता?
प्रथमेश कदम हा मराठी सोशल मीडिया जगतातील एक उगवता तारा होता. त्याच्या आई प्रज्ञा कदम सोबतच्या मजेशीर, भावनिक आणि धमाल रील्समुळे तो घराघरात पोहोचला होता. आई-लेकाची ही जोडी नाच, कॉमेडी आणि रोजच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींवर आधारित रील्स तयार करत असे. त्याच्या कंटेंटने लाखो फॉलोअर्स कमावले आणि ते मराठी रील स्टार म्हणून ओळखले जायचे. त्याच्या साधेपणा, हसऱ्या चेहऱ्या आणि कुटुंबप्रेमामुळे ते खूप लोकप्रिय होते.
प्रथमेशच्या जाण्याने सोशल मीडियावर शोक व्यक्त होत आहे.
तन्मय पाटेकर यांनी पोस्ट करून म्हटले, "Guyz we lost young talent... my friend Prathmesh bro uff bad news." इतर इन्फ्लुएन्सर्स आणि चाहत्यांनी श्रद्धांजली वाहत "तुझी आईसोबतची रील्स कधीच विसरता येणार नाही", "तुझ्या हसण्याने जग उजळायचे" अशा कमेंट्स केल्या. प्रथमेश कदम याच्या निधनाने मराठी कंटेंट क्रिएशन कम्युनिटीला मोठा धक्का बसला आहे.






