Home > News Update > राहुल गांधी यांच्या सुरक्षेचा प्रश्न, यात्रेत अचानक काय घडलं?

राहुल गांधी यांच्या सुरक्षेचा प्रश्न, यात्रेत अचानक काय घडलं?

राहुल गांधी यांच्या सुरक्षेचा प्रश्न, यात्रेत अचानक काय घडलं?
X

जम्मू-काश्मीरमध्ये काल शुक्रवारी अनेक लोक राहुल गांधींच्या सुरक्षा घेरात घुसले. हा सगळा प्रकार घडल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहुल गांधी यांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. खरगे यांनी गृहमंत्र्यांना या प्रकरणात वैयक्तिक हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. तसेच यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची मागणी केली आहे.

दुसरीकडे, शनिवारी सकाळी पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील चुरसू येथून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू झाली आहे. पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्यासह हजारो महिला या यात्रेत सहभागी झाल्याच आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रियंका गांधीही आज यंत्रात सहभागी होणार आहेत. सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काल शुक्रवारी यात्रा थांबवली होती. काँग्रेसने सुरक्षेतील त्रुटींसाठी भाजपला जबाबदार धरले.

यात्रेचा आजचा दिवस सकाळी सुरु झाला असून आज शनिवारी बिर्ला इंटरनॅशनल स्कूल, पंपोरजवळ चहापान झाले. श्रीनगरच्या बाहेरील पंथा चौकातील ट्रक यार्डमध्ये शनिवारी रात्री विश्रांती घेतली जाईल. 29 जानेवारी रोजी पांथा चौकातून ही यात्रा बुलेवर्ड रोडवरील नेहरू पार्क येथे पोहोचेल.

काल राहुल गांधींच्या सुरक्षा घेरामध्ये अचानक अनेक लोक घुसले...

शुक्रवारी, जम्मू-काश्मीरमधील काझीगुंडमध्ये राहुल गांधींच्या प्रवेशानंतर जवळपास एक किलोमीटर अंतरात त्यांच्या सुरक्षेतील मोठी त्रुटी समोर आली. याठिकाणी अनेक जण राहुल गांधी यांच्या सुरक्षा गराड्यात घुसले. यानंतर पोलिसांनी राहुल गांधी आणि ओमर अब्दुल्ला यांना गाडीत बसवून अनंतनागला नेले. अनंतनागमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, यात्रेदरम्यान पोलिसांची सुरक्षा व्यवस्था कोलमडली. बोगदा सोडल्यानंतर पोलिस दिसले नाहीत. माझ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सांगितले की आम्ही पुढे जाऊ शकत नाही. मला माझा प्रवास थांबवावा लागला असल्याचं त्यांनी सांगितले...

Updated : 28 Jan 2023 1:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top