Top
Home > News Update > मन की बात आहे पण मनातलं नाही,मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत: मनसेचा एकाच दगडात केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा

मन की बात आहे पण मनातलं नाही,मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत: मनसेचा एकाच दगडात केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा

मन की बात आहे पण मनातलं नाही,मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत: मनसेचा एकाच दगडात केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा
X

मनसेने कोरोनाच्या परिस्थितीवरुन मोदी सरकार सह ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही. असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे. एकंदरीत संदीप देशपांडे यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचे काम केलं आहे.

Updated : 4 May 2021 4:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top