Home > News Update > मनोज जरांगे आक्रमक होत मुंबईकडे रवाना

मनोज जरांगे आक्रमक होत मुंबईकडे रवाना

मनोज जरांगे आक्रमक होत मुंबईकडे रवाना
X

'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मला स्लाईन मधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला' असल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा आरोप

जालना : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज मराठा बांधवांना आवाहन केल्यानुसार राज्यभरातून सराटी अंतरवाली याठिकाणी महत्त्वाची बैठकीसाठी मराठा आंदोलक एकत्र आले होते. या बैठकीदरम्यान मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडवणीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.


मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले की "फडवणीस यांनी मला स्लाईन मधून विष देण्याचा प्रयत्न केला असा आरोप यावेळी पत्रकार परिषदेतून केला आहे तर फडवणीस यांना जर मला मारायचेच असेल तर मी मुंबईला त्यांच्या सागर बंगल्यावर येतो अशी आक्रमक भूमिका यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. जरांगे हे आक्रमक त्यांनी मुंबईकडे जाण्याची निर्धार केला आहे. मराठा आंदोलकांनी यावेळी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

तुमची तब्येत ठीक नसल्याचं सांगून या विषयावर आपण दोन दिवसांनी निर्णय घेऊन मुंबईकडे जाऊ अशी समजूत मराठा बांधव करत होते. दरम्यान मनोज जरांगे पाटील हे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी मुंबईकडे मला घेऊन चला असं म्हणत आक्रमक भूमिका घेत शेवटी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. सराटी अंतरवाली सोडत गाडीतून मनोज जरांगे मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Updated : 25 Feb 2024 11:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top