Home > News Update > भीमसैनिक मनोज गरबडेला जामीन मजूंर : आता काढणार हत्तीवरुन मिरवणुक

भीमसैनिक मनोज गरबडेला जामीन मजूंर : आता काढणार हत्तीवरुन मिरवणुक

भीमसैनिक मनोज गरबडेला जामीन मजूंर : आता काढणार हत्तीवरुन मिरवणुक
X

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबद्दल वादग्रस्त वक्तव्यांनंतर राज्यभरातून विविध संघटना, राजकीय पक्षांनी आंदोलने केली. पिंपरी -चिंडवड दौऱ्यावर असतांना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करण्यात आली. यानंतर समता सैनिक दलाचे मनोज गरबडे आणि दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्यावरील ३०७ कलम हे हटवल्याने आता त्यांना आता जामीन मंजूर झाला आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तिघांवर ३०७ सह इतर कलमानुसार गुन्हा दाखल होता. यामधील ३०७ म्हणजे खुनाचा प्रयत्न हे कलम कमी करण्यात आले आहे अशी माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली आहे. शनिवारी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली होती. यात तिघांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलं होतं. या प्रकरणातराजकीय दबावापोटी पोलिसांकडून आरोपींवर खुनाचा प्रयत्न – ३०७ हे कलम लावण्यात आलं असा आरोप आरोपीचे वकील सचिन भोसले यांनी केला होता. तसंच ३०७ कलम लावल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर विशेषतः भाजपावर सडकून टीका केली होती.

भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी शाईफेक करण्यात आली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. पिंपरीतील पाटील यांच्यावरील शाईफेकीचे पडसाद राजकीय पटलावर देखील उमटले होते. राजकीय आरोप- प्रत्यारोपांनी वातावरण देखील चांगलंच तापलं होतं. मात्र, आता चंद्रकांत पाटील यांच्यावर (Chandrakant Patil) शाईफेक करणार्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढत त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजप नेते व मंत्री पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. याचा निषेध म्हणून पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवड येथे शाईफेक देखील करण्यात आली होती. ही शाईफेक करणारे कार्यकर्ते हे समता सैनिक दल या संघटनेचे होते. समता सैनिक दलाच्या मनोज गरबडे या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेक केली होती. गरबडे हा अनेक वर्षांपासून समता सैनिक दलात कार्यरत आहे. तसेच तो अनेक सामाजिक कार्यात देखील कार्यरत आहे.

सांगली येथे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने मंगळवारी (दि.13) बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियायाचे अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे यांनी दिली आहे. या बैठकीला नंदकुमार भंडारे, संदीप ठोंबरे, वीरू फाळके, अशोक वायदंडे आदी उपस्थित होते.

कांबळे म्हणाले, भाजप नेते व मंत्री पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाउराव पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. याचा निषेध म्हणून पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवड येथे शाईफेक देखील करण्यात आली होती. या घटनेमुळे मूलतत्ववादी विचारांना लोकशाही मार्गाने विरोध करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला असून शाई फेक करणारे मनोज गडबडे व या घटनेचे छायाचित्रण करणारे पत्रकार गोविंद वाकडे यांची सांगलीत २३ डिसेंबर रोजी हत्तीवरून मिरवणूक काढून जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही मिरवणुक सुरू होणार असून लोकशाहीर अण्णा भाउ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.









राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर निलंबित पोलीस व शाईफेक करर दिलासा

राज ठाकरे यांना या प्रकरणामध्ये मध्यस्थी करण्याची विनंती काही कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलून या प्रकरणामध्ये मध्यस्थी करत त्या ११ पोलिसांचे निलंबन मागे घेण्याची विनंती केली. तसेच शाईफेक करणाऱ्या युवकावर लावण्यात आलेला ३०७ कलमही शिथिल करण्याची विनंती केली.

चंद्रकांत पाटील यांच्याकडून कारवाई न करण्याची विनंती

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर पिंपरीत करण्यात आलेल्या शाईफेक घटनेवर अगोदर संतप्त प्रतिक्रिया दिली होती.तसेच पोलिसांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित आरोपींवर 307 चा कलम लावत गुन्हा दाखल केला होता. आणि तडकाफडकी 11 पोलिसांचं निलंबन देखील केलं होतं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शाईफेक करणार्यांवर कडक कारवाईचे संकेत दिले होते.

मात्र, त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या प्रकरणी मध्यस्थी करत पोलिसांचं निलंबन रद्द करुन आरोपींवर 307 चे कलम न लावण्याबाबत पाटील आणि फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. यानंतर ठाकरेंच्या विंनतीला मान देत पाटील व फडणवीस यांनी कारवाई शिथिल करण्याबाबत सहमती दर्शविली होती. तसेच पाटील यांनी तर पोलिसांचं निलंबन मागे घ्यावं आणि आरोपींवर कोणत्याही कलमांतर्गत कारवाई केली जाऊ नये असं देखील म्हटलं होतं.

#मनोज_गरबडे नक्की कोण ?

कोल्हापूर- सांगलीला २०१९ला पूर आला होता त्यावेळी हजारो लोकांचे संसार पाण्याखाली गेले होते. महाराष्ट्रातून अनेक संस्थांनी कोल्हापूर सांगलीला मदत पाठवायला सुरवात केली. त्यावेळी पिंपरी चिंचवड मधून समता सैनिक दलाच्या वतीने दोन ट्रक भरून जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्त भागात वाटप करण्याचं नियोजन करणारा समता सैनिक दलाचा सैनिक मनोज गरबडे.

पूरग्रस्तांसाठी सगळीकडून ज्या प्रकारची जास्त मदत आली होती त्याचा अभ्यास करून ज्या वस्तूंची जास्त गरज आहे अशाच वस्तू पूरग्रस्तांना त्यावेळी वाटप करण्यात आल्या होत्या. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी तात्काळ मदत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणारा सच्चा कार्यकर्ता म्हणजेच मनोज गरबडे आणि समता सैनिक दल असे समीकरण असल्याचे सांगितले जाते.

Updated : 14 Dec 2022 10:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top