Home > News Update > सिंह इज बॅक, मनमोहन सिंह यांची कोरोवर मात

सिंह इज बॅक, मनमोहन सिंह यांची कोरोवर मात

सिंह इज बॅक, मनमोहन सिंह यांची कोरोवर मात
X

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह ( वय ८८) यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना १९ फेब्रुवारीला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्‍स रुग्णालयातील ट्रामा सेंटर मध्ये उपचार सुरु होते. त्यांना आता एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अलिकडेच मनमोहन सिंह यांनी कोरोना परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सल्ला दिला होता.. मनमोहन सिंह कोरोना झाल्याचं समजताच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करून या ट्वीट मध्ये तुम्ही लवकर बरे व्हा! देशाला या कठीण काळात तुमच्या सल्ल्याची आणि मार्गदर्शनाची गरज असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं

Updated : 30 April 2021 2:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top