Home > News Update > हे काय नाटक आहे मोदीजी? मनिष सिसोदियांचा मोदींना सवाल...

हे काय नाटक आहे मोदीजी? मनिष सिसोदियांचा मोदींना सवाल...

मनिष सिसोदिया यांना लूक आऊट नोटीस... नोटीस आल्यानंतर सिसोदियांचा थेट मोदींना सवाल... काय म्हटलंय सिसोदिया यांनी..

हे काय नाटक आहे मोदीजी? मनिष सिसोदियांचा मोदींना सवाल...
X

सीबीआयने आज रविवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य १३ जणांविरुद्ध लुक आउट नोटीस जारी केली आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना ही नोटीस जारी करण्यात आली आहे. दोन दिवसांपुर्वी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी सीबीआयने छापा टाकला होता. त्यानंतर आप विरुद्ध भाजप असा सामना रंगताना पाहायला मिळत आहे.

दरम्यान सिसोदिया यांना आलेल्या नोटीस नंतर सिसोदीया यांनी ट्वीट केलं आहे.

'तुमचे सर्व छापे फेल ठरले, काहीही सापडले नाही, एक पैसा हेरा फेरी सापडली नाही, आता तुम्ही लूक आउट नोटीस जारी केली आहे. तरीही मनीष सिसोदिया मिळत नाहीत. हे काय नाटक आहे मोदीजी?

मी दिल्लीत बिनधास्त फिरतोय, सांग कुठे येऊ? तुम्हाला मी सापडत नाही?'

असा प्रश्न करत थेट मोदींवर निशाणा साधला आहे.


दिल्लीच्या उत्पादन शुल्क प्रकरणात सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये मनीष सिसोदिया यांच्यासह १४ जणांची नावे आहेत. एकूण १५ आरोपींपैकी मनीष सिसोदिया यांना नंबर एकचे आरोपी बनवण्यात आले आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचार, गुन्हेगारी कटाचे आरोप आहेत.

दिल्लीच्या अबकारी धोरणात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एफआयआर नोंदवल्यानंतर सीबीआयने शुक्रवारी सिसोदिया आणि आयएएस अधिकारी अर्वा गोपी कृष्णा यांच्यासह 29 इतर ठिकाणी छापे टाकले होते.

जवळपास 14 तासांच्या छाप्यांनंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अनेक कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स काढून घेतले होते. अधिकाऱ्यांनी मनीष सिसोदिया यांच्या घरातून काही आर्थिक बाबतीतील कागदपत्रंही जप्त केली आहेत.

सीबीआयच्या एफआयआरमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, एका मद्यविक्रेत्याने मनीष सिसोदिया यांच्या सहकाऱ्याला एक कोटी रुपये रोख दिले.

सिसोदिया यांच्या घरी सीबीआयचा छापा पडल्यानंतर मनीष सिसोदिया यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर त्यांना आज लूक आऊट नोटीस जारी केली आहे. यावेळी त्यांनी भाजपचा खरा मुद्दा भ्रष्टाचार नाही तर अरविंद केजरीवाल आहे.

त्यांचा खरा मुद्दा भ्रष्टाचार नाही, त्यांचा खरा मुद्दा अरविंद केजरीवाल यांना रोखण्याचा आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले, कितीही कट कारस्थान केली तरी २०२४ ची निवडणूक नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यातच होणार आहे.

Updated : 21 Aug 2022 6:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top