Home > News Update > मालेगावमध्ये बेरोजगार युवकांना नोकरीचे आमिष दाखवून घातला 35 लाखांचा गंडा

मालेगावमध्ये बेरोजगार युवकांना नोकरीचे आमिष दाखवून घातला 35 लाखांचा गंडा

देशात बेरोजगारीचा दर वाढत आहे. त्यापार्श्वभुमीवर मालेगाव येथे बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून 35 लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली.

मालेगावमध्ये बेरोजगार युवकांना नोकरीचे आमिष दाखवून घातला 35 लाखांचा गंडा
X

देशात बेरोजगारीचे (Unemployment Rate) प्रमाण वाढत आहे. त्यावरून विरोधकांकडून सरकारवर टीकास्र सोडले जात आहे. त्यातच वाशिम (Washim) जिल्ह्यातील मालेगाव येथील तरुणांना नोकरी लावण्याच्या आमिषाने 35 लाखांचा गंडा घातल्याचा गैरप्रकार समोर आला आहे. त्याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुन्ह्याचा तपास सुरु असल्याचे म्हटले आहे.

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून (Cheated to youth) पैसे घेतल्याची घटना जून 2021 मध्ये घडली होती. त्यामध्ये बेरोजगार तरुणांना विविध खात्यात नोकरी लावून देतो, असं आमिष दाखवून 35 लाख रुपयांना चूना लावला. त्यावेळी तरुणांना नोकरीची बनावट ऑर्डर देऊन त्यांची फसवणूक केली होती, अशी धक्कादायक माहिती चौकशी दरम्यान समोर आली होती. या प्रकरणी 19 सप्टेंबर 2021 रोजी आरोपींविरोधात तरुणांनी कलम 420, 465, 468, 471 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सुत्रे फिरवून 9 आरोपींना अटक केली आहे. याबाबतचा तपास सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Updated : 12 March 2023 11:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top