Home > News Update > नागपूर जि.प. निवडणूक : भाजपचा बालेकिल्ला उध्वस्त, काँग्रेसची एकहाती सत्ता

नागपूर जि.प. निवडणूक : भाजपचा बालेकिल्ला उध्वस्त, काँग्रेसची एकहाती सत्ता

नागपूर जि.प. निवडणूक : भाजपचा बालेकिल्ला उध्वस्त, काँग्रेसची एकहाती सत्ता
X

नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व ५८ जागांचे निकाल घोषित झालेत. भाजपला धक्का देत काँग्रेसने नागपूर जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. जिल्हा परिषदेच्या एकुण ५८ जागांपैकी काँग्रेसने ३० जागा जिंकून स्पष्ट बहूमत मिळवलंय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बालेकिल्याची पडझड आता सुरु झाली असल्याचं या चित्र या निकालाने समोर आलंय. भाजपच्या पराभवाची सुरुवात विदर्भातून झाल्याची टिका जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.नागपुरकरांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर नाराजी व्यक्त केल्याचा टोमणाही त्यांनी लगावला.

गेले पाच वर्ष जिल्हा परिषदेवर पकड असलेल्या भाजपला यावेळी केवळ १५ जागा जिंकता आल्या आहेत. यापुर्वी भाजपने २१ जागा जिंकल्या होत्या. दूसरिकडे राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात दमदार पुनरागमन करत ११ जागांवर विजय मिळवलाय. तर गेल्या वेळी ८ जागा जिंकलेल्या शिवसेनेला यावेळी केवळ एक जागा राखता आली आहे. माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने ही निवडणूक लढली होती.

दूसरिकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मूळ गाव धापेवाडा इथून काँग्रेसचे उमेदवार महेश डोंगरे विजयी झालेत. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलिल देशमुख मेटपांजरा सर्कलमधून विजयी झालाय. सलिल देशमुख पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणूकीच्या आखाड्यात उतरले होते.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत 12 पैकी 11 जागा जिंकलेल्या भाजपला २०१९ च्या निवडणूकीत केवळ ७ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस- राष्ट्रवादीने मिळून पाच जागांवर विजय मिळवला होता. नागपूर जिल्ह्यातून भाजपचा विजयी आलेख झपाट्याने ओसरत असल्याचे संकेत विधानसभा निकालांनी दिले होते.

नागपूर जिल्हा परिषद

एकुण जागा- ५८

काँग्रेस- ३०

भाजप-१५

राष्ट्रवादी काँग्रेस-११

शिवसेना-०१

अपक्ष-०१

शेकाप-०१

२०१२- जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल

एकुण जागा- ५८

काँग्रेस- १९

भाजप-२१

राष्ट्रवादी काँग्रेस-०७

शिवसेना-०८

बसपा-०३

हे ही वाचा...

‘भाजपचं सावरकर प्रेम बेगडी आहे’

इराण – अमेरिका संघर्ष, जग महायुध्दाच्या उंबरठ्यावर?

नवीन वर्षातही विकासदर 6 टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता कमीच

Updated : 8 Jan 2020 9:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top