Home > News Update > समृद्धी महामार्गावर सरलांबे येथे मोठी दुर्घटना

समृद्धी महामार्गावर सरलांबे येथे मोठी दुर्घटना

समृद्धी महामार्गावर सरलांबे येथे मोठी दुर्घटना
X

शहापुर तालुक्यात समृद्धीचे गर्डर कोसळून १४ जण ठार तर ३ जण जखमी झाले आहेत.टीडीआरएफ़ टिम शहापुर घटनास्थळी पोहचुन रेस्क्यू करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

शहापूर जवळील खुटाळी गावाजवळ समृद्धी महामार्गाच्या पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना क्रेन व गर्डर कोसळले. या घटनेत आतापर्यंत १४ मजूर मयत झाले असून ३ जण जखमी झाले आहेत. जखमींना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल व शहापूर मधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी एनडीआरएफ ची टीम व अग्निशमन सह इतर टीम उपस्थित आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व महसूल प्रशासन घटनास्थळी उपस्थित आहेत.

रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. रात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली आहे. मंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळावर जाऊन घटनेची पाहणी केली आहे.

Updated : 1 Aug 2023 9:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top