Home > Top News > Max Maharashtra Impact: विवाहितेवरील बलात्कार प्रकरणी महीला आयोगाचे कारवाईचे आदेश

Max Maharashtra Impact: विवाहितेवरील बलात्कार प्रकरणी महीला आयोगाचे कारवाईचे आदेश

Max Maharashtra Impact: विवाहितेवरील बलात्कार प्रकरणी महीला आयोगाचे कारवाईचे आदेश
X

पालघरमधे अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच जव्हार मधील एका विवाहित महिलेवर गावातीलच एका नराधमाने बलात्कार केल्याची घटनेने वाढलेल्या संतापाची वृत्त Max Maharashtra ने प्रसिध्द केल्यानंतर पालघर पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ४८ तासांच्या आत सादर करण्याचा आदेश राज्य महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच, आता आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. जव्हार मधील एका विवाहित महिलेवर गावातीलच एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जव्हारपासून काही अंतरावर असलेल्या कुंडाचा पाडा येथे घडली आहे. काही दिवसांपूर्वी पीडित महिला घराच्या लगत असलेला हळदीचा कार्यक्रम आटोपून रात्री 11 च्या सुमारास घरी परतत होती. यावेळी आरोपीने या महिलेला रस्त्यात अडवले आणि जबरदस्तीने तोंडात रुमाल कोंबून पडक्या घरात खेचत नेले. तिथेच तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड झाले होते.

Max Maharashtra ने यासंबधीचे वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती.

पालघलर जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण यानंतर घाबरलेल्या त्या महिलेने सुरवातीला आपल्या पतीला काही सांगितले नाही. पण दोन दिवसांनी तिने पतीला खरी हकीकत सांगितल्यानंतर हा प्रकार पुढे आला होता.

या प्रकारानंतर 3 तारखेला रात्री 10 वाजता पीडित महिलेसह तिचे कुटूंब तक्रार देण्यासाठी जव्हार पोलीस ठाण्यात गेले होते. पण पोलिसांनी आपली तक्रार घेतली नसल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. यानंतर त्यांनी जव्हारच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर 24 तारखेला जव्हार पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण आता 18 दिवसांचा कालावधी उलटूनही आरोपी मोकाट आहे. यामुळे जव्हारमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हा सचिव अंनता वणगा यांनी गृह राज्यमंत्र्यांकडे केली होती. लवकरात लवकर आरोपीला अटक करा ,अन्यथा आम्ही कुटूंबासाहित एसपी कार्यालय समोर बेमुदत उपोषणाला बसू असा इशाराही त्यांनी दिला होता. Max Maharashtra ने हे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर सरकारला खडबडून जाग आली आहे.

पालघर पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ४८ तासांच्या आत सादर करण्याचा आदेश राज्य महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

मुळ बातमी :

https://www.maxmaharashtra.com/news-update/a-married-woman-raped-in-jawhar-palghar-district-accused-is-nor-arrested-after-14-days-1117511

Updated : 13 March 2022 2:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top