Home > News Update > रामदेवबाबांच्या कोरोनिलला राज्यात नो एन्ट्री: गृहमंत्री

रामदेवबाबांच्या कोरोनिलला राज्यात नो एन्ट्री: गृहमंत्री

देश दुसऱ्या कोरोना लाटेच्या उंबरठ्यावर असताना दोन केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितील कोरोनील लॉंच करणाऱ्या रामदेवबाबांना महाराष्ट्र सरकारने दणका दिला आहे. जागतिक आरोग्य संघटना, भारतीय वैद्यक परिषद या सक्षम यंत्रणांनी प्रमाणीकरण केल्याशिवाय पतंजलीच्या ‘कोरोनिल’ औषधाच्या विक्रीला राज्यात परवानगी दिली जाणार नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टि्वट करुन स्पष्ट केले आहे.

रामदेवबाबांच्या कोरोनिलला राज्यात नो एन्ट्री: गृहमंत्री
X

गतवर्षी भारतात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर अनेक औषधी काढे आणि आयुर्वेदीक औषधांचा सुळसुळाट झाला होता.

वर्षभरानंतर यातील फोलपण सर्वच शास्त्रीय यंत्रणांनी सिध्द केला होता. बाबा रामदेव यांच्या कंपनीने तयार केलेल्या औषधाबाबत गतवर्षीही प्रश्न उपस्थित केले होते. औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर भारतीय वैद्यक परिषदेने आक्षेप घेतले आहेत. हे औषध करोनावर उपयुक्त असल्याचा पतंजली कंपनीचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने फेटाळला आहे.


इतक्या घाईत हे औषध बाजारात आणणे आणि त्याच्या कार्यक्रमाला नितीन गडकरी आणि हर्षवर्धन या दोन मंत्र्यांनी उपस्थित राहणे चुकीचे होते. हा सारा गोंधळ लक्षात घेता महाराष्ट्रात पतंजली कंपनीच्या करोनावरील औषधाच्या विक्रीला परवानगी दिली जाणार नाही, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

Updated : 24 Feb 2021 6:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top