Top
Home > Max Political > अखेर मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते?

अखेर मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते?

अखेर मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते?
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटप केलं. या खातेवाटपाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. वाचा कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग.

एकनाथ शिंदे

गृह, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण.

छगन भुजबळ

ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन.

बाळासाहेब थोरात

महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय.

सुभाष देसाई

उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास.

जयंत पाटील

वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास.

डॉ. नितीन राऊत

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.

Updated : 12 Dec 2019 12:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top