महाराष्ट्रात लसीकरणाची नक्की काय स्थिती आहे?
X
राज्यात 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण केलं जाणार आहे. मात्र, तुम्ही जर लसीकरणासाठी घराच्या बाहेर पडणार असाल तर राज्यात लसीचे किती डोस शिल्लक आहेत. आणि किती लोकांनी लस घेतली हे समजून घेणं गरजेचं आहे.
राज्यात आत्तापर्यंत १ कोटी ५८ लाखापेक्षा अधिक नागरिकां कोरोनाची लस घेतली असून राज्यसरकारने दररोज ८ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या राज्यात राज्यात ६,१५५ लसीकरण केंद्र असून यातील ५३४७ शासकीय आणि८०८ खासगी लसीकरण केंद्र आहेत.
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी सुमारे १२ कोटी डोसेसची आवश्यकता आहे. नागरिकांनी लसीसाठी गर्दी करु नये. जशी लस उपलब्ध होईल. तसतसे या वयोगटात लस देण्यात येईल. सुरुवात हळूहळू असली तरी कृपया गोंधळ उडू देऊ नका. गर्दी करू नका. असं आवाहन सरकारने केलं आहे.
३ एप्रिल रोजी एका दिवसांत ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. २६ एप्रिल रोजी राज्याने लसीकरणात 5 लाखांहून अधिक जणांचे लसीकरण करून विक्रम नोंदविला. गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांच्या कितीतरी पुढे महाराष्ट्र असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे






