Home > News Update > सलून उघडण्यास राज्य सरकारची ‘अटी शर्थीसह’ परवानगी

सलून उघडण्यास राज्य सरकारची ‘अटी शर्थीसह’ परवानगी

सलून उघडण्यास राज्य सरकारची ‘अटी शर्थीसह’ परवानगी
X

आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे य़ांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत राज्यातील सलून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिली आहे.

लॉकडाऊन मुळं गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले सलून दुकानं सुरू करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. सोमवारपासून ही सलून दुकानं अटी शर्थीसह सुरू होणार आहे. लॉक डाऊन शिथिल केल्यावरही सलून दुकानं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता.

त्यामुळं या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलीय. राज्यात आर्थिक अडचणीमुळं 12 सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या. त्यामुळं ही दुकानं सुरू करावी, हा विषय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुर्नवसन मंत्री मांडला. त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

Updated : 25 Jun 2020 2:16 PM GMT
Next Story
Share it
Top