Home > News Update > शिवसेनेच्या संपर्क कार्यालयामागे कोट्यवधींचा सट्टयाचा अड्डा?

शिवसेनेच्या संपर्क कार्यालयामागे कोट्यवधींचा सट्टयाचा अड्डा?

शिवसेनेच्या संपर्क कार्यालयामागे कोट्यवधींचा सट्टयाचा अड्डा?
X

ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा संघर्ष राज्यभरात अनेक ठिकाणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याने एक धक्कादायक वास्तव समोर आणले आहे. जळगावमध्ये शिवसेना संपर्क कार्यालयाच्या मागील बाजूस सट्ट्याचा अड्डा सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीवरुन या सट्ट्याच्या अड्डयावर पोलिसांनी कारवाई केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौराच्या आदल्या दिवशीच शिंदे गटाने हा प्रकार समोर आणला. शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाच्या आड सुरु असलेल्या सट्ट्याच्या अड्डयावर पोलिसांनी केलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. हा सट्ट्याच्या अड्डया उध्दव ठाकरे समर्थक एका शिवसेना पदाधिकाऱ्याचा असल्याचा आरोप या शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याने केल्याने खळबळ उडाली आहे.




सुरुवातीला ठाकरे गटात असलेल्या आणि नंतर शिंदे गटात सहभागी झालेल्या पदाधिकारी शोभा चौधरी राहत असलेल्या रामेश्वर कॉलनी परिसरात शिवसेनेचे संपर्क कार्यालय आहे. पुढील बाजूला बाळासाहेब ठाकरेंचे बॅनर लावलेले आहेत. तिथे लोकांची खूप गर्दी असल्याचे दिसल्यानंतर शोभा चौधरी यांनी माहिती घेतली. त्यावेळी शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाच्या मागील बाजूस सट्ट्याचा खेळ सुरु असल्याचे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.

शोभा चौधरी यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यावरुन पोलिस घटनास्थळी पोहचेपर्यत याठिकाणी सट्टा खेळणारे व खेळविणारे दोन्ही पसार झाले होते. किमान 40 ते 50 जण इथे होते अशी माहिती शोभा चौधरी यांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर लावून त्यामागे जर सट्टा खेळविला जात असल्याने हा बाळासाहेबांना मोठा अपमान आहे असा आरोप शोभा चौधरी यांनी केला. तसेच याठिकाणी काही टारगट तरुण महिला, मुलींची छेड काढत असल्याचे प्रकार नित्याचेच असून मोठा गुन्हा घडण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

Updated : 20 Sep 2022 7:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top