Home > Election 2020 > Video : सुप्रिया सुळेंविषयी आक्षेपार्ह कमेंट टाकणाऱ्या तरुणाला कार्यकर्त्यांनी दिला चोप

Video : सुप्रिया सुळेंविषयी आक्षेपार्ह कमेंट टाकणाऱ्या तरुणाला कार्यकर्त्यांनी दिला चोप

Video : सुप्रिया सुळेंविषयी आक्षेपार्ह कमेंट टाकणाऱ्या तरुणाला कार्यकर्त्यांनी दिला चोप
X

खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह कॉमेंट करणाऱ्या तरुणाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला आहे. तसंच या तरुणाला चोप देतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. कोल्हापूरमधील चावरे (ता. हातकणंगले) येथील हा तरुण असून या तरुणाने खासदार सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्य पोस्ट केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या घरी जाऊन त्याला चांगलाच चोप देत त्याच्याकडून लेखी माफी लिहून घेतली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी ईव्हीएम नको, अशी आमची भूमिका आहे, असं वक्तव्य एका वृत्तवाहिनीला केलं होतं. त्यानंतर सदर वृत्तवाहिनीने ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली. त्यानंतर या विद्यार्थ्याने या बातमीखाली कमेन्ट करताना सुप्रिया सुळे यांच्या बाबत आक्षेपार्य वक्तव्य केले. राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

Updated : 17 May 2019 2:46 AM GMT
Next Story
Share it
Top