Home > News Update > महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने महालक्ष्मी येथे लसीकरणाचे आयोजन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने महालक्ष्मी येथे लसीकरणाचे आयोजन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने महालक्ष्मी येथे लसीकरणाचे आयोजन
X

दादर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार दादरमधील शारदाश्रम विद्यामंदिर येथे मोफत लसीकरणाचे कार्यक्रम घेण्यात आला आहे. या कार्यक्रमात आज सातशे नागरिकांचे लसीकरण करणार असल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्र शासनाकडून हवा तेवढ्या प्रमाणात लसीकरण होत नाही, एक दिवस लसीकरण सुरू राहते. तर दोन दिवस बंद असते, त्यामुळे लोकांचे लसीकरणासाठी हाल होत आहेत. हीच गोष्ट लक्षात घेऊन मनसेच्या वतीने लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . एकूण तीन दिवसात मनसेकडून एकवीसशे लोकांना लसीकरण करणार असल्याचे मनसेने सांगितले आहे. सध्या पहिला टप्पा सुरू आहे , त्याच्यानंतर गणेशोत्सवाच्यानंतर आम्ही दुसरा टप्पा असणार आहे अशी माहिती मनसेने दिली.

Updated : 3 Sep 2021 8:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top