Home > News Update > महिलांवरील अत्याचारांविरोधात मनसेचे तीव्र आंदोलन

महिलांवरील अत्याचारांविरोधात मनसेचे तीव्र आंदोलन

महिलांवरील अत्याचारांविरोधात मनसेचे तीव्र आंदोलन
X

दोन दिवसा पूर्वी डोंबिवलीत घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. त्यातच कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका आठ वर्षीय मुलीवर शिक्षकाने लैगिंक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याच महिला अत्याचारांविरोधात मनसे महिला सेनेच्या वतीने कल्याणच्या शिवाजी चौकात काळ्या फिती लावून व काळे कपडे घालून निषेध करण्यात आला. यावेळी राज्यसरकरचा निषेध करताना शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत अशा प्रकारे दुष्कृत्य करणाऱ्याना भर चौकात फाशी द्या अशी मागणी केली गेली.


Updated : 25 Sep 2021 12:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top