Home > News Update > अदानीला धारावी मिळते शेतकऱ्यांना काही मिळत नाही - ॲड. यशोमती ठाकूर

अदानीला धारावी मिळते शेतकऱ्यांना काही मिळत नाही - ॲड. यशोमती ठाकूर

अदानीला धारावी मिळते शेतकऱ्यांना काही मिळत नाही - ॲड.  यशोमती ठाकूर
X

आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. हे अधिवेशन जोरदार गाजण्याची शक्यता आहे. विरोधक सर्वसामान्याच्या प्रश्नावर आक्रमक झाले आहेत. यावर राज्याच्या माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्या म्हणाल्यात की "अदानीला धारावी मिळते शेतकऱ्यांना काय मिळतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तुम्ही नोकऱ्यांच्या वेबसाईट पाहिल्या तर त्या येवढ्या धिम्यागतीने चालताय कि बिचारे युवक खुप घाबरुन गेले आहेत. त्या पुढे म्हणाल्या की मराठा समाजाचं राजकारण करायला हे लोक निघालेत आणि मराठा युवक येथे आंदोलन करत आहे. आमदार विनायक मेटे यांच निधन समाजाच्या मिटींगला येताना झालं होत. त्यावर देखील कोणी बोलायला तयार नाही. पण 'स्वत: पुरत राजकारण आणि स्वत:साठी काही पण' असा टोलाही शिंदे-फडणवीस-पवार सरकारला ठाकूर यांनी लगावला आहे.

सत्ताधाऱ्यांनी यायच आणि आरडा ओरडा करायचा काही लोकांच्या काहण्या काढायच्या आणि मग त्याचं लोकांनी विरोधी बाकावरून सत्तेत बसाय हे न पटणार आहे, वेदनादायी आहे असं म्हणत यासर्व गोष्टीचा निषेध करत भाजप सरकारवर जोरधार टीका केली आहे.Updated : 17 July 2023 10:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top