Home > News Update > महाराष्ट्रातही कन्नड लोक राहतात हे लक्षात ठेवा; शिवसेनेचा इशारा

महाराष्ट्रातही कन्नड लोक राहतात हे लक्षात ठेवा; शिवसेनेचा इशारा

महाराष्ट्रातही कन्नड लोक राहतात हे लक्षात ठेवा; शिवसेनेचा इशारा
X

महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता महाराष्ट्र सह कर्नाटकात उमटायला लागले आहेत.

‘महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवर उभे करुन गोळ्या घाला’, असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केले होते.

हे ही वाचा...

उत्तर प्रदेश पोलिसांनी खरंच प्रियंका गांधींचा गळा पकडला का?

MannKiBaat : आमचे तरुण अराजकतेच्या विरोधात – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आपण पाकिस्तान होत चाललो आहोत : भालचंद्र नेमाडे

त्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात तणाव निर्माण झाला असून पुढील आदेश मिळेपर्यंत दोन्ही राज्यातील एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तर, “शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करणाऱ्यांची गाठ शिवसेनेशी आहे.

महाराष्ट्रात देखील कन्नड लोक राहतात हे कर्नाटक सरकारने लक्षात ठेवावे”, असा इशारा शिवसेनेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी दिला आहे.

Updated : 29 Dec 2019 7:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top