Home > News Update > 12 वीच्या परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा प्रश्न कायम

12 वीच्या परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा प्रश्न कायम

12 वीच्या परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा प्रश्न कायम
X

केंद्र सरकारने सीबीएसई व आयसीएसई या केंद्रीय मंडळांच्या परीक्षा रद्द केल्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने देखील राज्य मंडळाच्या इ.१२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील १४ महिने विद्यार्थी अभ्यासाच्या व परीक्षेच्या तणावाखाली आहेत.

विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता व मानसिक स्वास्थ अबाधित राखण्यासाठी व राज्यातील विविध परीक्षा मंडळांच्या मूल्यमापनामध्ये एकसुत्रता असावी यासाठी राज्य शासनाने या परीक्षा रद्द केल्याचं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

कोरोना १९ ची गंभीर परिस्थिती, मुलांमधील वाढता प्रादुर्भाव, तिसऱ्या लाटेची शक्यता या बाबी लक्षात घेता परिस्थिती अजूनही सामान्य झालेली नाही. इयत्ता १२ वीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी परीक्षेऐवजी पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा. तसंच विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत एकसमान धोरण निश्चित करावे. अशी मागणी राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे विनंती करण्यात आली होती. त्यानुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे.

याबाबत शालेय शिक्षण विभागाने परीक्षेबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षण विभागातील अधिकारी, तांत्रिक सल्लागार, शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत व्यक्ती इत्यादींशी विविध स्तरावर सखोल चर्चा केली. या चर्चांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता व आरोग्य लक्षात घेऊन परीक्षा रद्द कराव्यात व अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा. असा तज्ज्ञांचा कल होता. त्यानंतर शासनाने हा निर्णय घेतल्याचं सरकारने जाहीर केलं आहे.

राज्य मंडळाच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Updated : 3 Jun 2021 1:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top