Home > News Update > दरडग्रस्त तळीये गावासाठी गृहनिर्माण मंत्र्यांची मोठी घोषणा

दरडग्रस्त तळीये गावासाठी गृहनिर्माण मंत्र्यांची मोठी घोषणा

दरडग्रस्त तळीये गावासाठी गृहनिर्माण मंत्र्यांची मोठी घोषणा
X

महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आधीच रत्नागिरी आणि रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिस्थिती गंभीर आहे. रायगड जिल्ह्यात दरडग्रस्त मृतांचा आकडा ६० वर पोहचला, तर महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील ४९ मृतदेह आतापर्यंत आढळले आहेत. हेच दुर्घटनाग्रस्त तळीये गाव आता म्हाडा उभारणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

"तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल. गावकऱ्यांनी काळजी करू नये." अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांना दिलासा दिला. मुख्यमंत्र्यानी तळीये गावचा दौरा केला तेव्हा ते म्हणाले.

अशातच "कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे." अशी महत्वपुर्ण घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर वर केली. माळीण गावाप्रमाणे तळीये गावाचंही पुनर्वसन प्रत्यक्षात होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Updated : 25 July 2021 10:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top