महाराष्ट्रात विमानसेवा तूर्तास बंदच

Courtesy: Social Media

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 25 मार्चपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही विमानसेवा बंद ठेवल्या होत्या. पण आता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण महाराष्ट्रात विमानसेवेबाबत राज्य सरकारने याआधी जारी केलेले आदेशच लागू राहणार असल्याने राज्यात सध्या तरी विमानसेवा सुरू होऊ शकणार नाही.

राज्य सरकारने 19 मे रोजी काढलेल्या आदेशात विमानसेवा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता 47 हजारांच्यावर गेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर झोनच्या रचनेत बदल करण्या व्यतिरिक्त लॉकडाऊनचे सर्व निर्बंध कायम ठेवण्याचे जाहीर केले आहे.