Home > News Update > ठाकरे सरकार पडणार, अमित शहा यांचा दावा...

ठाकरे सरकार पडणार, अमित शहा यांचा दावा...

ठाकरे सरकार पडणार, अमित शहा यांचा दावा...
X

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासूनच भाजप नेते हे सरकार कोसळणार. असा दावा करत आहेत. एक दोन दिवस झाले की लगेच भाजपचा एक तरी नेता हे सरकार पडणार असा दावा करत असतो. मात्र, ठाकरे सरकार पडणार असा दावा गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.

त्यामुळं आता ही बाब जरा विचार करण्यासारखी आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी 'टाइम्स नाऊ'ला एक मुलाखत दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले

शिवसेनेने आमच्या सोबत निवडणूक लढवली होती. शिवसेना हा आमचा छोटा मित्र पक्ष होता. त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याची मोकळीक दिली होती. हे सरकार त्यांच्या ओझ्यानेच पडेल.

असा आमचा विश्वास आहे. आम्हाला काहीही करावं लागणार नाही.

असं म्हणत शहा यांनी महाराष्ट्रातील सरकार कोसळेल असा दावा केला आहे.

शिवसेना छोटा भाऊ...

राज्यात भाजप शिवसेनेच्या मदतीने वाढला. मात्र, गेल्या 10 वर्षात परिस्थिती बदलली. केंद्रात भाजप मोठा भाऊ आणि राज्यात शिवसेना मोठा भाऊ असं देखील बोललं गेलं. मात्र, ज्या शिवसेनेच्या मदतीने भाजप राज्यात वाढली. त्याच शिवसेनेला आता भाजपने छोटा भाऊ म्हणत डिवचलं आहे.

Updated : 20 April 2021 7:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top