Home > News Update > ICMRने केलेल्या शिफारसींच्या अभ्यासासाठी राज्य सरकारची समिती

ICMRने केलेल्या शिफारसींच्या अभ्यासासाठी राज्य सरकारची समिती

ICMRने केलेल्या शिफारसींच्या अभ्यासासाठी राज्य सरकारची समिती
X

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने कोरोना निदानासाठी शिफारस केलेल्या विविध रॅपिड ॲण्टी बॉडीज चाचण्या किंवा किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

विविध कंपन्यांनी उत्पादित केलेल्या किटचा अभ्यास करून ही समिती दहा दिवसात सरकारला अहवाल सादर करणार आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. तर ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. रणजीत माणकेश्वर, प्रा.डॉ.अमिता जोशी हे सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत.

समिती काय अभ्यास करणार?

  • आयसीएमआरने रॅपिड ॲण्टी बॉडी चाचण्यांसाठी शिफारस केलेल्या विविध चाचणी प्रणाली, किट यांचा अभ्यास करून त्यापैकी सर्वच अथवा निवडक चाचणी प्रणालीचा आणि किटचा राज्यात वापर करण्याची शिफारस करणे.
  • या चाचण्या पोलिस, आरोग्य सेवेशी निगडीत सर्व लोक, स्वच्छता कामगार, तसेच सामान्य जनता यांच्यावर करायच्या की निवडक लोकांवर करायच्या याबाबत शिफारस करावी.
  • शिफारस केलेल्या चाचण्या आणि किटच्या बाबतीत अभिव्यक्ती स्वारस्य (EOI) मसुदा तयार करून आरोग्य विभागाला सादर करायचा आहे.

Updated : 13 July 2020 1:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top