Top
Home > Max Political > अजित पवार उपमुख्यमंत्री...!

अजित पवार उपमुख्यमंत्री...!

अजित पवार उपमुख्यमंत्री...!
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाल्याच्या बातम्या सकाळी माध्यमांवर झळकत होत्या. अजित पवार हे त्यांच्या निवासस्थानी नसल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी माध्यमांना दिली होती. मात्र, त्यानंतर अजित पवार हे उपमुख्यमंत्री असतील हे जाहीर करण्यात आलं आहे.

हे ही वाचा...

अखेर प्रज्ञा ठाकूर यांची संसदेच्या संरक्षण समितीवरुन हकालपट्टी

बुलेट ट्रेनच्या १० हजार कोटी रुपयातून शेतकऱ्यांची कर्जमाफी

फोटोग्राफर, शिवसेना पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री…

त्यामुळे राज्यात आता उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे मुख्यमंत्री तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. दरम्यान अजित पवार यांनी मध्यंतरीच्या काळात शरद पवार यांच्याशी बंड करुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पाठींबा दिला होता. फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

मात्र, पुरेसं संख्याबळ नसल्यानं अजित पवार यांच्या सह देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Updated : 28 Nov 2019 6:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top