अंतिम वर्षाच्या परीक्षांचा घोळ, सरकारची नवी भूमिका

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत युजीसीने जारी केलेल्या आदेशानंतर देखील राज्य सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. युजीसीने जरी परीक्षा घेण्याचे आदेश दिले असले तरी कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्ने असल्याने सध्या परीक्षा घेणे शक्य नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

“परीक्षा घेऊच नये अशी शासनाची भूमिका नाही. मात्र, सद्यस्थितीत कोविड रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होते आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे सध्या शक्य नाही,” अशी
उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचबरोबर अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी सुमारे दहा लाख विद्यार्थी असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षक आणि इतर कर्मचारी वर्ग या सगळ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे सरकारने याबाबत फेरविचार करावा अशी मागणी करणारे पत्र उदय सामंत यांनी याआधीच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना पाठवलेला आहे. परीक्षांबाबत युजीसीच्या मार्गदर्शक सूचना बंधनकारक आहेत असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आधीच स्पष्ट केलेले आहे पण कोरूना च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह पंजाब ओडिषा तमिळनाडू पश्चिम बंगाल दिल्ली या राज्यांनी देखील परीक्षांना विरोध केलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here