Home > News Update > राज्यातील पोलिसांसाठी स्वतंत्र कोरोना दक्षता कक्षाची स्थापना - अनिल देशमुख

राज्यातील पोलिसांसाठी स्वतंत्र कोरोना दक्षता कक्षाची स्थापना - अनिल देशमुख

राज्यातील पोलिसांसाठी स्वतंत्र कोरोना दक्षता कक्षाची स्थापना - अनिल देशमुख
X

राज्यात कोरोनाबधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यानंतर राज्य सरकारने पाऊलं उचलत पोलिसांना तातडीने उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष निर्माण केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत, योग्य ती शासकीय नोकरी तसेच नियमानुसार मिळणारी मदत दिली जाईल असंही देशमुख यांनी सांगितलं.

कोरोना विशेष कक्ष व नोडल अधिकारी

कोरोना संदर्भात प्रकृतीची कोणतीही तक्रार असलेल्या पोलिस कर्मचारी किंवा अधिकाऱ्याला तातडीने उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. मुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर देखील संबंधित पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक हे अशा प्रकारचे कक्ष निर्माण करतील. तसेच मुंबईमध्ये दोन हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

Updated : 27 April 2020 1:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top