Home > News Update > पुणे जिल्ह्यात निर्बंध शिथिल होणार का? काय म्हणालेत पालकमंत्री अजित पवार वाचा सविस्तर

पुणे जिल्ह्यात निर्बंध शिथिल होणार का? काय म्हणालेत पालकमंत्री अजित पवार वाचा सविस्तर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत, दोन डोस घेतलेल्या नागरिकांना निर्बंधामधून शिथिलता देण्याचा विचार असल्याचे म्हटले आहे.

पुणे जिल्ह्यात निर्बंध शिथिल होणार का? काय म्हणालेत पालकमंत्री अजित पवार वाचा सविस्तर
X

पुणे // राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची आढावा घेत, अधिकाऱ्यांना सुचना केल्यात. पुणे जिल्ह्यात सध्या कोरोना पॉझिटिव्ह रेट 3.9 एवढा असून पुण्यात कोरोना मृत्यू दर 1.6 एवढा आहे. त्यामुळे पुण्यात लेव्हल तीनचे निर्बंध कायम राहतील असं उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटले आहे. पुण्यात सोमवारपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा विचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितले.

दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यक ती उपाययोजना प्रशासनाने करावी अशा सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टमध्ये येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

लसींचे दोन डोस घेतलेल्यांना निर्बंधातून शिथिलता देण्याचा विचार

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अनेकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले आहेत त्यांच्यासाठी कोरोना निर्बंधात शिथिलता आणण्याचा विचार असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. मात्र, तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढण्याची भीती असल्याने त्या दृष्टीने नियोजन केले जाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

Updated : 24 July 2021 12:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top