शिवसेनेची कोंडी ! कॉंग्रेस राष्ट्रवादीचं वेट अॅड वॉच…

राज्यात निर्माण झालेल्या सत्ता स्थापनेच्या पेच प्रसंगा संदर्भात आज कॉंग्रेसचे दिल्लीचे नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यात शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांसोबत सरकार स्थापण्यासाठी काल पहिल्यांदा संपर्क केला. तसंच काही मुद्द्यांवर स्पष्टता येणं गरजेचं आहे. त्यानुसार सविस्तर चर्चा केली जाईल. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल असं कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कॉंग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेची कोंडी वाढवल्याचं दिसून येत आहे.

पत्रकार परिषदेतील मुद्दे

काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण न देणं चुकीचं : अहमद पटेल

किमान समान कार्यक्रमासह अनेक मुद्यावर चर्चा आवश्यक,काही मुद्यावर चर्चा बाकी

शिवसेनेने काल आमच्याशी अधिकृत संपर्क साधला

काही मुद्दयावर स्पष्टता झाल्यावर पाठींबा

सरकार कसं बनवायचं हे स्पष्ट झाल्याशिवाय निर्णय नाही