Home > News Update > माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन
X

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं आज पुण्यात निधन झालं. ते महाराष्ट्राचे 1985 ते 1986 दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते कोरोना संक्रमीत होते. दोन दिवसापुर्वीच ते कोरोनातून बरे झाले होते. स्वातंत्र्यलढ्यात आणि महाराष्ट्राच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. बाणेदार आणि ठाम विचारसरणीचे नेते अशी त्यांची ओळख होती. मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी ते नेहमी आग्रही होते.

निलंगा मतदार संघाचे ते दीर्घकाळ आमदार होते. निलंगा तालुक्यात त्यांनी शिक्षणाचं जाळ विणलं.

त्यांचा जन्म ०९ फेब्रुवारी १९३१ ला निलंगा इथे झाला. ते हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक होते. एम.ए. एल. एल. बी. पर्यंत त्याचं शिक्षण झालं होतं.

लातूर जिल्ह्याच्या निर्मिती औरंगाबाद येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ, महाराष्ट्र सदन, राज्यातील विविध प्रकल्प, जिल्हा न्यायालये, अशी अनेक विकास कामं त्यांनी केली.

Updated : 5 Aug 2020 5:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top