Home > News Update > ज्योती कलानी कालवश

ज्योती कलानी कालवश

ज्योती कलानी कालवश
X

उल्हासनगरमध्ये आपल्या कामाने राजकीय वर्चस्व निर्माण करणाऱ्या ज्योती कलानी यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. आज सायंकाळी त्रास जाणवू लागल्याने त्यांना तात्काळ उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ७० वर्षांच्या होत्या. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, ज्योती कलानी यांचे पती पप्पू कलानी तळोजा येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असून पत्नी ज्योती कलानी यांच्या अंत्यविधीसाठी ते पॅरोलवर सुटण्याची शक्यता आहे.

ज्योती कलानी यांचा राजकीय प्रवास...

ज्योती कलानी यांनी उल्हासनगर महापालिकेत नगरसेवक पदापासून राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर स्थायी समिती सभापती, महापौर व आमदार अशी पद त्यांनी भूषवली. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. राजकारणात त्यांची ओळख भाभी म्हणून होती.

उल्हासनगरमधील राजकारण त्यांच्या शिवाय पूर्ण होत नव्हते. कुख्यात टाडा फेम माजी आमदार पप्पू कलानी यांच्या त्या पत्नी होत्या. पप्पू कलानी यांच्या राजकीय वलयामुळे त्या या पदापर्यंत पोहोचल्या होत्या. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्या आजमितीला राष्ट्रवादी सोबत होत्या.

Updated : 18 April 2021 5:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top