Top
Home > Max Political > वाई विधानसभा मतदारसंघ लढत

वाई विधानसभा मतदारसंघ लढत

वाई विधानसभा मतदारसंघ लढत
X

यावर्षी वाई विधानसभा मतदारसंघ रंगतदार ठरणार आहे. वाई हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक शहर आहे. वाई कृष्णा नदीच्या काठावर असलेले एक धार्मिक क्षेत्र आहे. काही जण वाईला दक्षिण काशी मानतात. सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये एकाच दगडातून सलगपणे घडविलेली मूर्ती असलेले वाईचे ढोल्या गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे. हा गणपती वाईचे ग्रामदैवत आहे. भोसले घराण्याला राजकारण व समाजकारणाची अर्धशतकाची परंपरा आहे. ही परंपरा जपताना आणि समाज-सेवेचा वारसा पुढे चालविताना मदन भोसले यांनी संपूर्ण वाई विधानसभा मतदारसंघालाच आपले कुटुंब मानले आहे. आम्हीही त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे समर्थन करताना त्यांना जनतेच्या भल्यासाठी पूर्ण मोकळीक दिली आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा

या वाटचालीत त्यांनी केलेला विकास आपल्यासमोर आहे. आता त्यांना न्याय देण्याची जबाबदारी जनतेची असून येणाऱ्या निवडणुकीत त्यांना प्रचंड मतांनी निवडून देऊन त्यांच्या समाजसेवेची पोहोचपावती आपण द्यावी, अशी भावनिक साद कॉंग्रेस पक्षाचे वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदार संघातील उमेदवार मदन भोसले यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. नीलिमा भोसले यांनी घातली. डॉ. भोसले म्हणाल्या, किसन वीर साखर कारखान्याच्या माध्यमातून या कारखान्याचा चौफेर विकास साधताना वाई मतदारसंघातील जनतेचे सार्वजनिक, वैयक्तिक प्रश्न सोडविताना मदनदादांनी आमच्या कुटुंबापेक्षा या प्रश्नांना प्राधान्य दिले. मदन भोसले यांनी २०१४ ची निवडणुक कॉग्रेसकडुन लढवली होती. पंरतू यावर्षी भाजपाच्या तिकीटावर निवडणुक लढवणार आहे पंरतु मदन भोसले यांना ही निवडणुक सोपी जाणार नाही हे मात्र नक्की.

Updated : 19 Oct 2019 3:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top