Home > Max Political > माण खटाव विधानसभा मतदारसंघ लढत

माण खटाव विधानसभा मतदारसंघ लढत

माण खटाव विधानसभा मतदारसंघ लढत
X

यंदाच्या निवडणुकीत माण मतदारसंघाची लढाई बंधु-बधु मध्ये रंगणार आहे सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात असणारे माण खटाव हे दोन तालुके कायम चर्चेत असतात ते इथल्या वर्षानुवर्षापासून चालत आलेल्या दुष्काळामुळे. केवळ दोन तालुक्यात चारा छावण्या असणारे हे देशातले एकमेवाद्वितीय असे तालुके म्हणावे लागतील. या तालुक्याचं राजकारणही कायम या दुष्काळाच्या समस्यांच्या अवतीभोवती फिरत आलं आहे. यंदा शेखर गोरे आणि जयकुमार गोरे हे सख्खे भाऊ पक्के वैरी होऊन माण विधानसभा मतदारसंघात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा

माण मतदारसंघात काही गावं अशी आहेत ज्यांचा माढा या लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. लोकसभेला माढा मतदारसंघात असणारा खटाव तालुक्यातील काही भाग गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण्यांनी त्यांच्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी वापरला. त्यामुळेच या मतदारसंघातून शरद पवारांसारखे राष्ट्रीय नेते निवडून येऊनही इथली जलसंधारणाची कामं होऊ शकलेली नाहीत. यावर्षी विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांना म्हणावी तितकी सोपी लढत जाणार नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांच्याविरोधात काम केलं होतं. विधानसभा तोंडावर आल्याचं पाहून आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर त्यांचे सख्खे बंधू शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. दोघंही विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याने युतीचा फॉर्म्युला गडबडणार आहे.

Updated : 19 Oct 2019 3:45 PM GMT
Next Story
Share it
Top