Home > News Update > राज ठाकरेंवर कारवाई होणार- रजनीश सेठ पोलिस महासंचालक

राज ठाकरेंवर कारवाई होणार- रजनीश सेठ पोलिस महासंचालक

राज ठाकरेंवर कारवाई होणार-  रजनीश सेठ पोलिस महासंचालक
X

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ४ तारखेचा अल्टीमेटम दिला आहे.राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.आता पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी १५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून १३ हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

गृहमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यव्थेच्या दृष्टीने आढावा बैठक घेतली.महाराष्ट्र पोलिस दल कायदा सुव्यस्थेचा प्रश्न हाताळण्य़ास सक्षम आहेत.आमची पुर्ण तयारी आहे.कोणत्याही परिस्थितीत कायदा बिघडू नये यासाठी आम्ही सर्वांना सूचना केल्या आहेत.याआधी आम्ही सर्वांना सूचना केल्या आहेत.समाजकंठक, गुन्हेगार स्वरुपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.असं रजनीश सेठ यांनी सांगितलं आहे.

सामाजिक एकोपा राखण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेतल्या आहेत.एसआरपीएफ, होमगार्ड मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यात तैनात करण्यात आले आहेत.कायद्याची अमंलबजावणी करणं पोलिसांची जबाबदारी आहे.कोणीही ते बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.राज्यात शांतता,सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावं असं मी राज्यातील जनतेला आवाहन करतो असं रजनीश सेठ यांनी सांगितलं

एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा सुवयवस्था राखावी यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत," असं रजनीश सेठ यांनी सांगितलं.

Updated : 3 May 2022 11:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top