Home > News Update > दिलासा राज्यात आज 53 हजार 249 रुग्ण कोरोनामुक्त, मृतांचा आकडा चिंताजनक

दिलासा राज्यात आज 53 हजार 249 रुग्ण कोरोनामुक्त, मृतांचा आकडा चिंताजनक

दिलासा राज्यात आज 53 हजार 249 रुग्ण कोरोनामुक्त, मृतांचा आकडा चिंताजनक
X

आज राज्यात ५३ हजार २४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज राज्यात ३९,९२३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर दुसरीकडे राज्यात आज ६९५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झालीआहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ४७,०७,९८० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८.६८% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,०६,०२,१४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३,०९,२१५ (१७.३५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ३४,८२,४२५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,३१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण ५,१९,२५४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –Updated : 2021-05-14T23:37:07+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top