Home > News Update > कोरोना रुग्ण वाढ मंदावली, मृत्यूचा आकडा चिंताजनक

कोरोना रुग्ण वाढ मंदावली, मृत्यूचा आकडा चिंताजनक

राज्यात कोरोना रुग्णवाढ मंदावली असली तरी मृत्यूचा आकडा चिंताजनक आहे. पाहा तुमच्या जिल्ह्यात काय आहे स्थिती?

कोरोना रुग्ण वाढ मंदावली, मृत्यूचा आकडा चिंताजनक
X

आज राज्यात कोरोनाते २६,६७२ नवीन रुग्ण आढळले आहेत. आज २९,१७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ५१,४०,२७२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.१२% एवढे झाले आहे.

राज्यात कोरोनाने होणाऱ्या मृत्यूचा आकडा चिंताजनक असून आज राज्यात ५९४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३०,१३,५१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,७९,८९७ (१६.९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात २६,९६,३०६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २१,७७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण

राज्यात आज रोजी एकूण ३,४८,३९५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे..



Updated : 23 May 2021 4:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top