Home > News Update > राज्यात तासाला 32 कोरोना रुग्णांचा मृत्यू, कोरोनाचा उद्रेक थांबेना

राज्यात तासाला 32 कोरोना रुग्णांचा मृत्यू, कोरोनाचा उद्रेक थांबेना

राज्यात तासाला 32 कोरोना रुग्णांचा मृत्यू, कोरोनाचा उद्रेक थांबेना
X

कोरोना रुग्णवाढीचा दर कायम असून आज राज्यात ६६ हजार ८३६ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. राज्यात आज रोजी एकूण ६,९१,८५१ ॲक्टिव्ह रुग्ण असून आज राज्यात आज ७७३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर १.५२% एवढा झाला आहे.

आज राज्यात ७४ हजार ०४५ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले तर आजपर्यंत एकूण ३४,०४,७९२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.८१ एवढे झाले आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,५१,७३,५९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४१,६१,६७६ (१६.५३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४१,८८,२६६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,३७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Updated : 23 April 2021 6:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top