Home > News Update > नांदेडमध्ये ऑक्सिजनचा साठा अपुरा बेडही फुल्ल, कोरोना रुग्णांना पाठवले जातं घरी…

नांदेडमध्ये ऑक्सिजनचा साठा अपुरा बेडही फुल्ल, कोरोना रुग्णांना पाठवले जातं घरी…

नांदेडमध्ये ऑक्सिजनचा साठा अपुरा बेडही फुल्ल, कोरोना रुग्णांना पाठवले जातं घरी…
X

कुलदीप नंदुरकर


नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयातील रुग्णांना चक्क घरी पाठवले जात असून इथला ऑक्सिजनचा साठा येत्या काही तासात संपणार असल्याची धक्कादायक माहिती रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.वाय एस चव्हाण यांनी दिली आहे. रुग्णालयातील बेड पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

दि.६ एप्रिलला झालेल्या बैठकीत नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जम्बो कोविड सेंटरला मान्यता दिली आहे ,यात एकाचवेळी २०० रुग्णांना उपचार केले जाईल असे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून सुरू असताना अचानक ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा आणि बेड शिल्लक नसल्यामुळे येथे दाखल झालेल्या रुग्णांची अक्षरशः हेळसांड होत आहे .

ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावले…

आपले संपूर्ण कुटूंब कोरोना पॉझिटिव्ह झाल्यावर बेडसाठी अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. अशी माहिती समर्थनगर येथील श्रावणी मामीडवार या तरुणीने आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितली. सामान्य लोकांना बेडसाठी खूप संघर्ष करावा लागतोय, अशा या परिस्थितीत जगण्यासाठी किती वणवण भटकावे लागत आहे असे सांगत देशाचे प्रधानमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री यांना श्रावणीने मदतीसाठी हाक दिली आहे .

या परिस्थितीच्या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही . अचानक इतक्या लवकर रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा का संपतो यावर जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी प्रतिक्रिया दिली नाही , याला जबाबदार कोण ,यावर आता काय कारवाई होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे .

कुलदीप नंदुरकर

Updated : 11 April 2021 12:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top