Home > News Update > काँग्रेसची पत्रकार अर्णब गोस्वामींवर कारवाईची मागणी; नागपुरात तक्रार दाखल

काँग्रेसची पत्रकार अर्णब गोस्वामींवर कारवाईची मागणी; नागपुरात तक्रार दाखल

काँग्रेसची पत्रकार अर्णब गोस्वामींवर कारवाईची मागणी; नागपुरात तक्रार दाखल
X

देशात सामाजिक विद्वेष पसरविणे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी रिपब्लिकन टीव्हीचे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने केली आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं.

‘पालघर मध्ये घडलेल्या दोन साधूंसह तीन जणांच्या निर्घृण हत्येचा आम्ही निषेध करतो. हे अत्यंत दुख:द आणि अमानवीय कृत्य आहे. मात्र सदर घटनेत कोणताही धार्मिक विद्वेषाचा दृष्टीकोन नाही, असे असतांनाही काही माध्यमे व राजकीय व्यक्ती या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्रासह देशाचे सामाजिक वातावरण बिघडवण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे', असं काँग्रेसच्या निवेदनात म्हटलंय.

यासोबतच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संदर्भात अर्णब गोस्वामी यांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसनं निषेध केला. अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलीय.

दरम्यान, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात नागपूरच्या पोलिस उपायुक्त परिमंडल २ विनीता साहू यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

Updated : 23 April 2020 1:15 AM GMT
Next Story
Share it
Top