Home > News Update > CMO कडून पुन्हा औरंगाबादचा संभाजीनगर उल्लेख;थोरात काय भूमिका घेणार?

CMO कडून पुन्हा औरंगाबादचा संभाजीनगर उल्लेख;थोरात काय भूमिका घेणार?

CMO कडून पुन्हा औरंगाबादचा संभाजीनगर उल्लेख;थोरात काय भूमिका घेणार?
X

औरंगाबाद शहराच्या नामांतराचा वाद चांगलाच तापला असताना मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटवर बुधवारी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला होता. तर यावरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, पुन्हा एकदा मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटवर औरंगाबाद जिल्ह्याचा उल्लेख संभाजीनगर म्हणून करण्यात आला आहे.

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत सोशल अकाउंटवर टाकण्यात आली होती. मात्र, याचवेळी औरंगाबाद जिल्ह्या संबंधित घेण्यात आलेल्या एका निर्णयाची माहिती टाकताना संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला होता.

त्यानंतर यावरून बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त करत, "माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नसल्याचं" म्हंटलं होत.

तर CMO कडून संभाजीनगरच्या उल्लेखावर बोलताना, कधीतरी टाइप करताना चूक होत असते. त्यामुळे CMO चं ट्विटर हॅंडल करणारऱ्या व्यक्तीला आम्ही समज देऊ'', असं मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी एका मराठी वृत्तवाहीनीशी बोलताना म्हंटलं होत. मात्र, आता CMO ट्विटर हॅंडलवर आता पुन्हा एकदा संभाजीनगरचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता यावर बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

Updated : 8 Jan 2021 4:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top