मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या ‘या’ घोषणेचं केलं स्वागत…

17

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या घोषणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच एका व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये याविषयी पंतप्रधानांना योजनेस मुदतवाढ देण्याची विनंती केली होती.

या योजनेत तांदूळ आणि चणा डाळ देण्यात येत असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सुमारे 7 कोटी लोकांना याचा लाभ होणार आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

 

Comments