Home > News Update > कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांची मदत

कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांची मदत

कुर्ला  इमारत  दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांची मदत
X

मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दरम्यान या दुर्घटनेमधील मृतांची संख्या १० झाली आहे. कुर्लापूर्व मध्ये नाईक नगर भागात ही इमारत कोसळली होती. मुंबई महापालिकीने दिलेल्या माहितीनुसार कुर्ला येथील इमारत कोसळण्याच्या घटनेमध्ये आणखी ६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता १० झाली आहे. तर या घटनेत १३ जण जखमी झाले होते. यापैकी ९ जणांचे उपचार पूर्ण झाले असून ४ जणांवर उपचार अजून सुरू आहेत. चार मजल्यांची ही इमारत सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास कोसळली आहे. ढिगाऱ्याखालून २३ जणांना सुखरुपपणे काढल्याचे सांगितले जाते आहे.

दरम्यान ही इमारत धोकादायक असल्याची नोटीस महापालिकेने बजावली होती. या इमारतीचा एक भाग कोसळला आहे, तर दुसरी विंगही पडण्याची शक्यता व्यक्त होते आहे. दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही घटना घडल्यानंतर रा६ २ वाजता जाऊन पाहणी केली होती. तसेच दुपारी मंत्रिमंडळ बैठकीआधीही त्यांनी या ठिकाणी जाऊन बचावकार्याची माहिती घेतली. जखमींना तातडीचे उपचार मिळावेत, जखमी तसेच मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक अशा सुविधा तातडीने मिळाव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

Updated : 28 Jun 2022 1:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top