Home > News Update > महाराष्ट्र द्वेष्ट्यांच बदनामीचं कारस्थान उधळून लावलं: मुख्यमंत्री

महाराष्ट्र द्वेष्ट्यांच बदनामीचं कारस्थान उधळून लावलं: मुख्यमंत्री

Maharashtra CM Uddhav thackeray addresses state corona diwali

महाराष्ट्र द्वेष्ट्यांच बदनामीचं कारस्थान उधळून लावलं: मुख्यमंत्री
X

मुंबई मेट्रोची आरे कारशेडची जागा कांजूरमार्गला हलवण्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहेत. सर्वांची उत्तरं आमच्याकडे आहे. त्यांना योग्य वेळी समर्पक उत्तर देऊ. विरोधकांकडून मीठागरांची जमीन आहे असं सांगून प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही टीकेची चिंता न करता यावर आम्ही काम करत राहू. जर्मनीच्या कंपनीकडून ५४५ दशलक्ष युरोंचं कंपनीकडून माफक दरात कर्ज घेतलं आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. आतापर्यंतचे सर्व सण साधेपणाने साजरे केले. गेले ८ महिने जनतेने जे सहकार्य केले त्याला तोड नाही. या सहकार्यामुळेच आपण तणावमुक्त आहोत. दुसऱ्या लाटेची चिंता आहे. ती येऊ नये यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. प्रदूषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो. त्यामुळे प्रदूषण करणारे फटाके टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.

या दिवाळीत फटाके न फोडण्याचा स्वत: संकल्प करा. आतापर्यंत जे आपण कमावले आहे ते चार दिवसाच्या धूरामध्ये वाहून जाता कामा नये. सार्वजनिक ठिकाणी फटाके लावू नयेत. आपल्याला समाजाची काळजी घ्यायची आहे. रोषनाई जरुर करा, पण फटाके वाजवू नका. तुमच्यावर मी आणीबीणी आणत नाही आहे. मी काय तुम्हाला फटाके वाजवूच नका, फटाक्यांवर बंदी घालत नाही आहे. केवळ हा सण आनंदाने, जास्त फटाके न वाजवता साजरा करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

आता जरी परिस्थिती आटोक्यात दिसत असली तरी दिवाळीत आणि दिवाळीनंतरचे १५ दिवस कसोटीचे आहेत. याचे कारण म्हणजे पाश्चिमात्य देशात ज्या पद्धतीने कोरोनाचे आकडे वाढले आहेत. तीच परिस्थिती आपल्या इथे नको आहे. युरोपात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. आपल्याकडे ही लाट यायला द्यायची नाही आहे. त्यासाठी आपल्याला सर्व ती काळजी घ्यावी लागेल. कोरोनाच्या लढाईत मास्क हेच महत्त्वाचे शस्त्र आहे. सर्वांनी मास्क वापरा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई होणार असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल. मात्र, त्याबाबत घाई करून चालणार नाही. सर्वप्रथम आपल्याला मंदिरे सुरु करण्यासंदर्भातील नियमावली तयार झाली पाहिजे. मंदिरे, मशीद, चर्चमध्ये आपण तल्लीन होऊन आरत्या करत असतो. या तल्लीनतेचा परिणाम आपल्याला नंतर भोगता कामा नये, यासाठी मंदिरे, मशीद आणि चर्च उघडण्यात उशीर करत आहोत. यावरुन माझ्यावर अनेकजण टीका करत आहेत. पण जनतेसाठी वाईटपणा घेण्याची माझी तयारी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी गर्दी टाळा हाच मंदिरासाठी नियम, असे सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

विरोधकांच्या बदनामीनंतरही आपल्या महाराष्ट्राने जून महिन्यात नव्या उदयोगधंद्यांशी १७ हजार कोटींचे करार केले. हे करार केवळ कागदावर राहणार नसून प्रत्यक्षात येतील, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यामुळे महाराष्ट्रात नवी गुंतवणूक आणि उद्योगधंदे येत आहेत. त्यामुळे रोजगार निर्माण होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

लोकल ट्रेन लवकरच सुरु होईल

मुंबईतील लोकल ट्रेन कधी सुरु होणार, याकडे डोळे लावून बसलेल्या मुंबईकरांना लोकल ट्रेन लवकरच सुरु होईल असे आश्वासन दिले आहे. लोकल ट्रेन सूचनेनुसार हळूहळू सुरू होत आहेत. याबाबतीत केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आपल्याला चांगल्याप्रकारे सहकार्य करतील, अशी खात्री असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी रेल्वमेमंत्र्यांना चिमटा काढला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या लाईव्ह संवादात काय म्हणाले ?

कोरोना पॉझिटिव्हिटी रेट :

जून महिन्यातील २२.०५ वरुन ऑक्टोबर महिन्यात १३.४७ वर

सध्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट १० पेक्षा कमी आहे.

३१ मार्च रोजी वाढीचा दर २७,२ इतका होता.

३० एप्रिल रोजी ७.२८, मे मध्ये ४.३५ , जूनमध्ये ३.३२, जुलैमध्ये २.४२,

मृत्यू दर :

जो मार्च मध्ये १२.९१ होता तो आता २.६३ वर आला आहे.

रुग्ण दुप्पट वेग :

मार्च मध्ये ५.४ होता, तो सप्टेंबर मध्ये ५३.२२ दिवस, ऑक्टोंबर मध्ये २०४ दिवस आणि आता २१७ दिवस इतका वाढला आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी २०८ दिवसांवर

धारावीत पुन्हा विक्रम:

रुग्ण दुपटीचा कालावधी सर्वात जास्त ३५१ दिवसांवर.याठिकाणी सध्या केवळ ७७ उपचाराधीन रुग्ण.

सप्टेंबरमध्ये दिवसाला २० हजार,२२ हजार असे रुग्ण. आता ५ हजार रुग्ण इतके प्रमाण

रिकव्हरी रेट:

जून महिन्यातील ५७.५० % वरुन ९१.०७ % एवढा वाढला

एक्टीव्ह रुग्णांची संख्या ६३ टक्केपेक्षा कमी

आता १,लाख ०६ हजार ५१९ रुग्ण उपचार घेत आहेत.

१७ सप्टेंबर रोजी एक्टीव्ह रुग्णांची संख्या ३ लाख होती.

आयसीयूमध्ये केवळ ५ ते साडेपाच हजार रुग्ण.

व्हेंटीलेटर्सची गरज एकदम कमी. बेड्सची उपलब्धता हा आता प्रश्न उरलेला नाही.

सुविधा वाढवल्या, चाचण्यांमध्ये वाढ

प्रयोगशाळा :

३५९ शासकीय आणि ११७ खाजगी अशा ४७६ प्रयोगशाळा

९२ लाख ५० हजार २५४ चाचण्या पूर्ण.

दर दशलक्ष लोकसंख्येमागे राज्यात ६८,६८१ चाचण्या .तर राष्ट्रीय सरासरी ८१,८७२ इतकी

बेडस / व्हेंटीलेटर्स :

मार्च २०२० - २११ रुग्णालयात ७७२२ बेडस,आय सी यु बेडस ३०९१

११४३ व्हेंटीलेटर्स

आज ३७८७ रुग्णालयामध्ये ३.६३ लाख एवढे बेडस. यातील ५९,५४४ ऑक्सिजन बेडस ८१५८ व्हेंटीलेटरची सुविधा

किंमतींवर निर्बंध :

सीटी स्कॅनच्या फीवर निर्बंध

शासकीय रुग्णालयात रेमडिसिव्हिर हे इंजेक्शन मोफत

खाजगी रुग्णालयातही या इंजेक्शनची किंमत रु. २३६० रुपयांपर्यंत कमी

खाजगी प्रयोगशाळांमधील कोविड निदान चाचणी शुल्क नऊशे रुपयांपर्यंत कमी मास्कच्या किमतीवरही नियंत्रण.

६७ हजार ५७० आशा स्‍वयंसेविका / ३५८२ गटप्रवर्तक यांना दरमहा अतिरिक्‍त मोबदला

५०० रुग्‍णवाहिका खरेदी करणे सुरु

४१९ रुग्णालयांत टेलिरेडीओलॉजी.आजपर्यंत १५ हजार २२२ रुग्‍णांचे अहवाल तपासले

माझे कुटुंब, माझी जबाबदारीचे यश

हे सगळे आपण साध्य करू शकलो माझे कुटुंब, माझी जबाबदारी सारख्या देशातल्या एकमेव अशा जनजागृती व आरोग्य सर्व्हेक्षण मोहिमेमुळे.

९९ टक्के लोकसंख्या कव्हर

१५ सप्टेंबर ते २४ ऑक्टोबर या दरम्यान दोन टप्यांत

आरोग्य स्वयंसेवक २ कोटी ७४ लाख ६३ हजार (९९ टक्के) घरांपर्यंत पोहोचले.

१ हजारापेक्षा जास्त करोना रुग्ण सापडले

३ लाख ५७ हजार 'आयएलआय' व सारीचे रुग्णदेखील आढळले.

मधुमेहाचे ८लाख ६९ हजार, उच्च रक्तदाबाचे १३ लाख आठ हजार, हृदयरोगाचे ७३ हजार, कर्करोगाचे १८ हजार, अशा २३ लाख ७५ हजार रुग्णांचा शोध घेण्यात आला.

डिसेंबरमध्ये परत एकदा ही मोहीम राबवावी म्हणजे करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल असे आमचे नियोजन आहे.

कायम मास्क लावणे, वारंवार हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे ही त्रिसूत्री आपण विसरता कामा नये

मास्क घातला नाही तर दंड होणारच

एक दक्ष नागरिक बना. आता कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून स्वत:चे आरोग्य चांगले ठेवणे आणि दुसऱ्यालाही ठेवायला भाग पाडा

संपूर्ण देशात महाराष्ट्राने दिली अर्थचक्राला वेगवान गती

आज आपण आपल्या दैनंदिन व्यवहारातल्या जवळपास बऱ्याच गोष्टी सुरु केल्या आहेत. त्यासाठी कार्य पद्धती ठरवून दिली आहे, याचे कारण या सगळ्या गोष्टींशी राज्याच्या अर्थचक्राचा संबंध आहे. यावर लाखो लोकांचे रोजगार अवलंबून आहेत.

सिनेमागृहे , नाट्यगृहे सुरु

जिम, व्यायामशाळा सुरु

रेस्टॉरंट सुरु झाली आहेत

ग्रंथालये, वाचनालये सुरु

मुंबईत सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा

नियमित लोकल सेवा सुरु करण्यासंदर्भात रेल्वेबरोबर चर्चा सुरु

दिवाळीनंतर धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे उघडण्यासंदर्भात कार्य पद्धती अंतिम होत आली आहे.

उद्योगांची मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात

कोरोनाशी सगळ्या जगाचा कडवा मुकाबला सुरु असताना महाराष्ट्राने पहिल्या टप्प्यात मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ची सुरुवात केली आणि १७ हजार कोटींचे करार विविध कंपन्यांसमवेत केले

दुसऱ्या टप्प्यात नुकतेच आम्ही १५ कंपन्यांशी ३४ हजार ८५० कोटीचा गुंतवणूक करार केला. २३ हजार १८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे

असं नाही की एकाच क्षेत्रात ही गुंतवणूक झाली. तर इलेक्ट्रॉनिक, इंधन तेल व वायू, रास्याने, लॉजिस्टिक्स, डेटा सेंटर अशी विविधांगी गुंतवणूक आली आहे.

आगामी काही वर्षांत तर महाराष्ट्र हे लॉजिस्टिक्स आणि डेटा सेंटर याबाबतीत देशाचे हब झालेले आपण पाहाल

नुसते करारच केले नाहीत तर पहिल्या टप्प्यात करार केलेल्या कंपन्यांना जागा देणे व इतर प्रक्रिया पूर्ण करणे असे ६० टक्के काम झाले आहे, हे महत्वाचे आहे.

बल्क ड्रग पार्क आणि वैद्यकीय उपकरण पार्क

रायगड जिल्ह्यात बल्क ड्रग पार्क आणि औरंगाबाद येथे ऑरिक सिटीमध्ये वैद्यकीय उपकरण पार्कसाठी विशेष प्रोत्साहने. यामुळे राज्यामध्ये वैद्यकीय उपकरण तसेच औषधी उत्पादनास मोठा वाव.

बल्क ड्रग पार्क व वैद्यकीय उपकरणे निर्मिती पार्क याची प्रकल्प किंमत रु. 2442 कोटी इतकी तर वैद्यकीय उपकरण निर्मिती पार्कची प्रकल्प किंमत 424 कोटी रुपये इतकी.

जर्मनीच्या केएफडब्ल्यु विकास बँकेकडून मेट्रोसाठी कर्ज

मुंबई-ठाणे प्रवास गतिमान करणारा मेट्रो मार्गिका ४ आणि ४ अ प्रकल्प आता वेळेत पूर्ण होईल.

जर्मनीच्या केएफडब्ल्यु विकास बँकेकडून भारतातील सर्वात जास्त रक्कमेचे ४५ दशलक्ष युरो इतके कर्ज आम्ही मंजूर करून घेतले आहे.

विशेष म्हणजे भारतातील इतर प्रकल्पाकरीता दिलेल्या कर्जपुरवठयापैकी हे कर्ज सर्वात कमी व्याजदराचे आहे.

सुमारे दोन लाख प्रवासी दररोज ठाणे मुंबई प्रवास करतात, त्यांना याचा फायदा होईल शिवाय पुढील काही वर्षात मुंबईतील सार्वजनिक दळणवळण व्यवस्थेत आमुलाग्र बदल होईल .

नागपूर: वातानुकुलित ब्रॉडगेज मेट्रो ट्रेन्स

नागपूर शहर व परिसरात रेल्वेच्या सध्याच्या पॅसेंजर ट्रेन्सऐवजी आधुनिक प्रकारच्या वातानुकुलित ब्रॉडगेज मेट्रो ट्रेन्स सुरु करणार. महामेट्रोने यासाठी 333.60 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प.

निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ

आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात दरमहा 10 हजार रुपये वाढ.

शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना यापूर्वीच विद्यावेतन वाढ

'फोर्स वन' मधील जवानांना प्रोत्साहन भत्ता

पोलिसांच्या 'फोर्स वन' मधील शूर जवान, अधिकारी, कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोग काळातील दरानेच प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय

दिवाळीनंतर शाळा सुरु

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात असे निर्देश मी दिले आहे. सविस्तर एसओपी तयार करण्यात आली असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने टप्प्या टप्प्याने शाळा सुरू करण्यात येतील

लाखाहून जास्त जणांना रोजगार

लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत ऑक्टोबरअखेरपर्यंत १ लाख १५ हजार ९२८ इतक्या बेरोजगारांना रोजगार मिळाला

मुख्यमंत्री कार्यालयात महिलांसाठी विशेष सहायता कक्ष

महिला विकासाच्या योजना कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरणे गरजेचे आहे. यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आपली भूमिका असून मुख्यमंत्री कार्यालयात महिलांचे प्रश्न आणि समस्या निवारण तसेच त्यांच्यासाठीच्या योजनांना गती देणे आणि सध्याच्या योजनांतील अडचणी दूर करणे, नवीन योजना आखणे यासाठी विशेष कक्ष उभारण्याचा निर्णय

'विकेल ते पिकेल' या धर्तीवर आधुनिक बाजारपेठेच्या मागणीशी उत्पादननिर्मितीची सांगड. त्यासाठी माविम, उमेदच्या (राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान) उपक्रमांना व्यापक स्वरुप

मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जलद पुनर्विकासाकरिता नवीन मार्गदर्शक सूचना देण्याचा निर्णय. लाखो रहिवाशांना दिलासा

शिवभोजन थाळीचा दर पुढील सहा महिन्यांसाठी 5 रुपये. सध्या ९०६ शिवभोजन केंद्रे

आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देणार

कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर आदरातिथ्य क्षेत्राचे पुनरुज्जीवन व पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने आदरातिथ्य क्षेत्राला औद्योगिक दर्जा देण्याचा निर्णय.

यानुसार हॉटेल व्यावसायिकांकडून 1 एप्रिल 2021 पासून वीज दर, वीज शुल्क, पाणी पट्टी, मालमत्ता कर, विकास कर व अकृषिक कराची आकारणी औद्योगिक दराने घेणार

कापूस खरेदी केंद्रांना सुरुवात

राज्यातील कापूस खरेदी केंद्रे सुरु करीत असून दिवाळीपर्यंत सर्व केंद्रे सुरु होतील

नोव्हेंबर शेवटच्या आठवड्यात फेडरेशनची कापूस खरेदी होईल.

अपेक्षित उत्पादन ४२५ लाख क्विंटल इतके असून १२० केंद्रे असतील

कोविडपूर्वी आणि कोविड नंतरच्या काळात आम्ही विक्रमी कापूस खरेदी केली. २१८.७३ लाख क्विंटल. रुपये ४९६९ कोटी रुपये निधी शेतकऱ्यांना दिला.

मुग, उडीद, सोयाबीनची हमी भावाने खरेदी सुरु आहे. गेल्या महिन्यातच खरेदीस सुरुवात. मुग २१७१ क्विंटल, उडीद ११०.10 क्विंटल, सोयाबीन ३६.८७ क्विंटल

विकेल तेच पिकेल मुळे शेतकऱ्यांना लाभ

आमच्या नव्या अभियानास चांगला प्रतिसाद आहे. विकेल तेच पिकेल असे याचे नाव आहे. शेतात राबवून पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. बाजारपेठेचा कल ओळखून मुल्यसाखळी निर्माण करतांनाच शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरेल आणि त्यातुन शेतकरी चिंतामुक्त होईल.

शाळांना अनुदानामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांना लाभ

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा एकूण २१६५ शाळांना २० टक्के व ह्या याआधीच २० टक्के अनुदान घेणाऱ्या २४१७ शाळांना अतिरिक्त २० टक्के अनुदान.

बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना राबविणार

राज्यातील कायम वास्तव्य करीत असलेल्या माजी सैनिक व त्यांच्या विधवांना एका निवासी मालमत्तेचा कर, घरपट्टी माफीच्या योजनेस मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना असे नाव अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्तांना तातडीने अर्थसहाय्य. 10 हजार कोटींची अर्थसहाय्य घोषित

Updated : 8 Nov 2020 9:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top